-
अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध) « मागील भाग --- Pope Francis addresses the crowd before delivering his Easter message from the main balcony of St. Peter’s Basilica at the Vatican on 16th April 2017 . जगभरातील प्रत्येक माणसांत एक संभ्रमित जनावर दडलेले असते. जनावरांच्या तुलनेत माणसाची ग्रहणशक्ती जितकी वाढली आहे त्या मानाने आकलनशक्ती अजून बरीच मागे आहे. त्यामुळे अनेकदा माणसाला अनेक प्रश्नांना, माहितीला, समस्यांना सामोरे जावे लागते ज्याच्याबाबत काय करायचे हे त्याला/तिला उमगत नाही. समस्या समोर असते पण तिच्या कारणांचे आकलन त्याला/तिला झालेले नसते. अशा वेळी एकतर कुणाला तरी ते झाले आहे आणि त्या समस्यांचे उत्तर त्याच्याकडे आहे असे गृहित धरणे सोयीचे असते. काळाच्या त्या प्राचीन तुकड्यात माणसाच्या जाणिवेला जनावरांपेक्षा अधिक वस्तुनिष्ठ आयाम मिळू लागले होते. त्या विकसित झालेल्या बुद्धीमुळे भयाचे आकलनही अधिक तीव्र झाले होते. परंतु जाणीव जागी झाली असली तरी मर्यादित बौद्धिक, शारीरिक व तांत्रिक वकुबामुळे अजूनही अनेक प्रकारचे धोके, अना...
पुढे वाचा »
बुधवार, १४ जून, २०२३
जम्प-कट - ६ : अजन्मा जन्मासि आला (उत्तरार्ध)
Labels:
‘मुक्त-संवाद’,
जम्प-कट,
जिज्ञासानंद,
संस्कृती,
समाज
रविवार, ४ जून, २०२३
जम्प-कट - ५ : अजन्मा जन्मासि आला (पूर्वार्ध)
-
कुटुंबव्यवस्था आणि वारसा « मागील भाग --- मानवाच्या टोळीजीवनाच्या काळात त्याचे आयुष्य भूक, भावना आणि भय या तीनच बाबींभोवती बांधलेले होते. भूक अन्नाने भागवली जात होती. टोळीजीवनामध्ये आपल्या टोळीतील व्यक्तींबाबत बांधिलकी, आपलेपण तर अन्य टोळीतील व्यक्तींबाबत द्वेष, तिरस्कार, शत्रुत्व या भावना असत. माणसाची भूक भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नसंपादन, आहारसिद्धता याबाबत लेखमालेच्या मागील भागांमध्ये विवेचन आलेले आहे. त्याचप्रमाणे मानवी समाजव्यवस्था विविध संक्रमणातून जात असतानाची स्थित्यंतरेही नोंदवलेली आहेत. या भागामध्ये मानवी जीवनात असलेले भय आणि त्या अनुषंगाने देव संकल्पनेची उत्पत्ती नि तिचा पुढील प्रवास याबाबत उहापोह केलेला आहे. भयवाटेने प्रवेश माणूस जंगलजीवी, टोळीजीवी असताना भय त्याला अनेक वाटांनी भेटीस येत असे. https://stillunfold.com/ येथून साभार. शिकारीला जाताना शिकारीकडे लक्ष एकाग्र केले असता सापासारखे एखादे जिवाणू त्याला दंश करुन जात असे अथवा वाघासारखे एखादे शिकारी जनावर त्याच्यावरच हल्ला करत असे. अचानक ...
पुढे वाचा »
शुक्रवार, १२ मे, २०२३
जल्पकांस—
-
( शाहीर रामजोशी यांच्या पायीच्या धूलिकणातून फुटलेला अंकुर) ’कोर्ट’ चित्रपटामध्ये शाहिराच्या भूमिकेत वीरा साथीदार. गटागटाने ट्विटा मारूनि सोटा धरिशी का मनीं जगाची उठाठेव कां तरी? पोस्टीत अथवा ट्विटेत (१) हो का, रिळांत (२) घ्या हो कधी स्नेहाचे नांव निज अंतरी काय मनांत धरूनि इतरांशी वाकडे ही काय जगाचे हित करतिल माकडे आंतून थरकती, बाहेर वीर फाकडे अगा शेळपटा उगा स्वत:ला शूर म्हणविसी गड्या करुनि फुकाच्या काड्या भला जन्म हा तुला लाभला मनुष्यप्राण्याचा धरिशी का डूख अहि (३) सारखा ट्विटेट्विटेवर शिळा पडो या, बिळांत लपुनि फेका तरिही न होय ’तयाची’ (४) कृपा दर्भ वृत्तीचा मनीं धरोनी टोचशी कोणा फुका जाळिशी तव रुधिराला वृथा गुंडउदंडउद्दंड झुंड झुंडीची कृपा न सार्थक, वांझच सारे खपा हे वार-वाग्बाण जराही येतील ना कामा ह्या दुर्लभ नरदेहात ठेवी करुणा श्रमवंत भुकेला, तू अस्मिता-चोळणा (५) वर्म कळेना, धर्म सुचेना, कर्माने तू गधा बांधुनि घे कविरायाचा शिधा - शाहीर लांबहोशी (१). ट्विट: (आता ‘X’ या नावाने ओळखल्या जाणार्...
पुढे वाचा »
शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३
कविचा वडा
-
https://pixers.hk/ येथून साभार. “डोंगराला आग लागलेली आहे... डोंगराला आग लागलेली आहे, आणि तू बटाटेवडा खातो आहेस...?” कविता सादर करणार्या कविने माझ्याकडे बोट दाखवले. मी दचकलो! बटाटेवडा निसटून चटणीमध्ये... आणि ड्रग्जचा व्हावा तसा मला चटणीचा ओव्हरडोस “... याला तूच जबाबदार आहेस!” ऐकणार्या चार जणांकडे फिरवून कविने बोट माझ्यावर रोखले. “पण मी कुठे लावली ती आग?” मी वड्यापासून तिखट चटणी निपटून काढत विचारले. “पण ती लागताक्षणीच विझवायला धावलाही नाहीस तू.” कविने डोळे वटारत म्हटले. “तू तरी कुठे विझवायला गेलास?” मी हेत्वारोप कम व्हॉटअबाऊटरी असा दुहेरी राष्ट्रीय तर्क अनुसरला. “पण मी कवी आहे आणि कविता वाचतो आहे.” कवी छाती फुगवून म्हणाला. “मी ही खादाड आहे आणि बटाटेवडा खातो आहे.” मी कवितेचे पुस्तक मिटले. - रमताराम - oOo -
पुढे वाचा »
सोमवार, २४ एप्रिल, २०२३
ह्याला भाजप आवडत नाही... (ऊर्फ इलेक्शनचा ’गारवा’)
-
(’ कुण्या एकाची सत्तागाथा ’ या ’राजकीय विरहगीता’नंतर त्याच दोन मित्रांच्या राजकीय जीवनातील एक टप्पा.) (कवि सौमित्र यांची क्षमा मागून...) ह्याला भाजप आवडत नाही, त्याला भाजप आवडतो. निकाल हाती आल्यावर हा त्याच्या तावडीत सापडतो. ’मी तुला आवडतो, पण भाजप आवडत नाही, असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.’ ’भाजप म्हणजे चिखल सारा, एक तू सुदृढ कमळ.’ ’भाजप म्हणजे हुकमी सत्ता, अमित किती प्रेमळ.’ ’भाजप नंतर दगा देतो, भाजप दगाबाजी’ ’भाजप म्हणजे वॉशिंग-मशीन, भाजप तरती होडी.’ ’भाजप म्हणजे मुरगळल्या माना, भाजप म्हणजे मुकी वरात.’ ’भाजपमध्ये, तपासातून सुटून, मन होऊन बसतं निवांत.' जेव्हा जेव्हा इलेक्शन येते, दरवेळी असं होतं सरकारवरून भांडण होऊन, लोकांमध्ये हसं होतं भाजप आवडत नसला, तरी तो ह्याला आवडतो भाजपसकट आवडावा तो, म्हणून तो ही झगडतो. रूसून मग तो निघून जातो, झुरत राहतो पक्षात. ह्याचं त्याचं भांडण असं इलेक्शनच्या दिवसात. - सन्मित्र - oOo -
पुढे वाचा »
गुरुवार, २० एप्रिल, २०२३
जम्प-कट - ४ : कुटुंबव्यवस्था आणि वारसा
-
टोळी ते समाज आणि माणूस « मागील भाग --- खाण तशी माती, झाड तशी कैरी जी. ए. कुलकर्णींच्या ’बखर बिम्म’ची मध्ये बिम्म आंब्याच्या झाडाला विचारतो की, ’तुझ्या झाडाला आंबेच का लागतात?’ त्या प्रश्नाला झाडाने दिलेले उत्तर मार्मिक आहे. ते म्हणते, ’असेच काही नाही. माझ्या झाडाला संत्री, मोसंबी, सफरचंदे, केळी अशीही फळे लागतात. पण ती सर्व कैरीसारखीच दिसतात.’ तीन-चार वर्षे वयाच्या बिम्मची जिज्ञासू बुद्धी ज्या पातळीवर असते, त्याच पातळीवर टोळीमानवाचीही असावी. एखाद्या फळातून निघालेली बी रुजली तर त्यातून आलेल्या झाडाला परत तेच फळ येते, तसेच माणसाचे मूल हे माणसासारखेच असते हे त्याला समजत होते. अनुवांशिकतेचे वैज्ञानिक कोडे उकलण्यास अजून कित्येक सहस्रकांचा अवकाश असला, तरी निव्वळ निरीक्षणाच्या पातळीवर ती नोंद घेतली जात होती. माणूस प्राणिजीवनातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर होता, तेव्हा नर-मादी संबंध हे देहभोगाच्या पातळीवरच होते. त्याचा मूल होण्याशी असलेला संबंधही अद्याप माणसाला उलगडला नव्हता. पुढे व्यवस्था म्हणून एकास-एक असे नर-मा...
पुढे वाचा »
Labels:
‘मुक्त-संवाद’,
जम्प-कट,
जिज्ञासानंद,
संस्कृती,
समाज
मंगळवार, १८ एप्रिल, २०२३
कुण्या एकाची सत्तागाथा (एक राजकीय विरहगीत )
-
राजकीय आखाड्यामध्ये एका राजकीय नेत्याच्या विरोधी पक्षनेत्याशी असणार्या साट्यालोट्याबद्दल सतत कुजबूज होत असते. एका पंच पंच उष:काली दोघांनी बांधलेली गाठ ज्येष्ठांच्या आशीर्वादाअभावी सोडावी लागल्यानंतर त्यांच्यातील संबंधांबद्दल अधूनमधून वावड्या उठत असतात. त्यात कितपत तथ्य आहे ते त्या दोघांनाच ठाऊक. एक नक्की, भूतकालातील त्या आशादायी पहाटेची आठवण काढत त्यांच्यातील एक जण संध्याकाळी उदास फिरताना दिसतो. एका हताश क्षणी त्याने शब्दबद्ध केलेली आपली विरहवेदना... https://www.bhaskar.com/ येथून साभार (कविवर्य ’ आरती प्रभू ’ यांची क्षमा मागून...) तो येतो आणिक जातो येताना कधी सह्या आणितो अन् जाताना चिठ्या मागतो येणे-जाणे, देणे-घेणे असते सारे जे न कधी तो सांगतो येताना कधी आधी लपतो तर जाताना तो लपवितो कळते काही, उगीच ते ही नकळत बोले पुशित बाही पदावाचून कधीच ’नाही... नाही...’ म्हणतो येताना त्याची खुलते कळी गुणगुणतो तोही भूपाळी* जाताना कधी करून बेत येण्यासाठीच फिरून येथ मध्येच येतो, निघून जातो... हे सलते - oO...
पुढे वाचा »
मंगळवार, ११ एप्रिल, २०२३
बिम्मच्या पतंगावरून - ४ : आपल्या पक्ष्याचा शोध
-
( प्रसिद्ध लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘बखर बिम्मची’ या छोटेखानी पुस्तकाचे बोट धरून केलेला हा प्रवास ) प्रतिबिंबांचा प्रश्न « मागील भाग --- एकदा कपाट आवरत असताना बिम्मच्या आईने त्यातून एक लहानसा पिंजरा बाहेर काढला. पिंजर्याचे दार मोडलेले होते, पक्ष्याचे अस्तित्त्व संपून गेले, पण रंग नि आतील दांडी नव्या पक्ष्याचे स्वागत करायला अजूनही उत्सुक होती. पूर्वी त्यात एक पिवळा पक्षी (१) होता हे आईकडून बिम्मला समजते. ‘आता तो कुठे गेला?’ हा प्रश्न ओघाने आलाच. त्या पक्ष्याचे काय झाले असेल हे तर्क करण्याजोगे आहे. पण खरे ते सांगणे म्हणजे बिम्मच्या पुढच्या अवघड प्रश्नांना सामोरे जाणे आहे. साहजिकच ‘त्याच्याशी खेळायला कोणी नव्हते म्हणून कंटाळा येऊन तो उडून गेला असेल.’ असे सांगत आईने ते टाळले आहे. ‘मग मी त्याला बोलावून आणतो.’ असे म्हणून बिम्म त्या कामगिरीवर निघतो. मग मागील आवारातील आजोबांच्या मदतीने त्याने त्या पक्ष्याचा शोध सुरू करतो. या आधीच्या भागांमध्ये सामोरे गेलेल्या ‘मी कोण?’, ‘यापैकी मी कोण?’ याचा पुढचा प्रश्न म्हणजे ‘माझे कोण?’ या प्रश्नापाशी बिम्म आता पोहोचला आहे. नीनमला श...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)







