Vechit Marquee

सूची: अनुक्रमे  ▶ वर्गीकरण  ▶ लेखमाला  ▶ लक्षवेधी  ◼

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८

‘आधार’ जीवा...


  • सर्वप्रथम व्यक्तिस्वातंत्र्याचा यथायोग्य वापर केल्याबद्दल न्या. चंद्रचूड यांचे अभिनंदन. परंतु याचा अर्थ मी त्यांच्याशी सहमत आहे असा मात्र नाही. (हे दोन्ही एकाच वेळी कसे असू शकते, हे काहींच्या चटकन ध्यानात येणार नाही. पण पुढे वाचा.) धन-विधेयक म्हणून पास करणे, आणि टेलिफोन/बँक सक्तीबाबत त्यांच्या मताशी सहमत. पण सरकारी योजनांबाबत नाही. जर खासगी बँका कर्ज देताना आपली नियमावली तयार करु शकतात, तर सरळसरळ सहानुभूती म्हणून, तुमची जबाबदारी स्वीकारुन सवलती देऊ करणारे सरकार आधारची सक्ती का करु शकत नाही? त्या योजनांचा गैरवापर टाळण्यासाठी, सुसूत्रपणे ती राबवण्यासाठी, प्रत्येक लाभधारकाची बिनचूक नि नेमकी ओळख पटवण्यासाठी (unique identification) ‘आधार’चा वापर सक्तीचा केला तर काय चूक आहे?  बँका साल्या तुमच्याकडून कर्जावर व्याज घेतात नि वर तुमचे ते घर मॉर्गेज करुन घेतात, तुमच्या सिबिल स्कोर पासून तुमच्या उत्पन्नाचे सत्राशे साठ पुरावे मागतात. तुम्ही ते निमूटपणे त्यांना देता. बँकेला सॅलरी स्लिप, आयटीआरची कॉपी, फोन नं., पत्त्याच्या पुरावा... अशा ढीगभर ...

    पुढे वाचा »

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

अशी ही पळवापळवी


  • ‘अशी ही बनवाबनवी’ला तीस वर्षे पुरी झाल्याच्या निमित्ताने थोरले महागुरु नव्या कोर्‍या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. चित्रपटाचे नाव आहे ‘अशी ही पळवापळवी’. मुख्य भूमिकांत विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि नीतिन संदेसरा यांना कास्ट केले आहे. चित्रपटातील धनंजय माने गावाकडून पुण्याकडे प्रयाण करतात, तर या रिमेकमध्ये इंटरनॅशनल लेवल आणण्याच्या दृष्टीने ते ‘मुंबईहून लंडनला पलायन करतात’ असा अपग्रेड देण्यात आला आहे. मल्ल्या प्रथम परदेशी पोचल्याने धनंजय मानेंच्या भूमिकेसाठी मीच योग्य आहे असा त्याचा दावा होता. पण ‘मेहुल आणि नीरव यांचे आल्रेडी नाते असल्याने, त्यांना माने बंधूंच्या भूमिकेत कास्ट करणे योग्य ठरेल’ असे थोरल्या महागुरुंनी त्यांच्या गळी उतरवले आहे. त्यामुळे आता मल्ल्या आणि संदेसरा यांना स्त्री-भूमिकांत पहायची पाळी आपल्यावर येते, की कहानी में पुन्हा ट्विस्ट येतो हे पाहायचे. लीलाबाई काळभोर यांच्या भूमिकेसाठी प्रेमळ स्वभावाच्या सुषमाताई, तर विश्वास सरपोतदार यांच्या भूमिकेत जेटलीकाका फिट्ट बसतात. उगा कन्ट्रोवर्सी नको म्हणून त्या...

    पुढे वाचा »

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

अफवेच्या प्रसाराची साधने


  • इंदिराजींच्या काळात पहिली अणुचाचणी झाली त्या दिवशी ‘भारत हा इच्छा असेल तेव्हा अण्वस्त्रसज्ज होऊ शकतो’ हा संदेश भारताला लष्करीदृष्ट्या बळकट करुन गेला. त्यामुळे इतिहासात तो दिवस कधीच विसरता न येण्याजोगा. त्याचप्रमाणे आजचा दिवसही कधीच विसरता न येण्याजोगा! जसे अण्वस्त्र हे लष्करीदृष्ट्या अमोघ अस्त्र तसेच ‘छद्म’ किंवा सोप्या भाषेत अफवा हे सामाजिक/राजकीय दृष्ट्या अमोघ अस्त्र. याची पहिली व्यापक चाचणी आजच्याच दिवशी १९९५ साली झाली. ती कमालीची यशस्वी झाली. ‘गणपती दूध पितो आहे.’ अशी भुमका नव्यानेच प्रचलित होऊ लागलेल्या इंटरनेटजन्य माहिती-माध्यमांतून उठली. जो उठतो तो आपल्या घरचा गणपती कसा दूध प्याला, याचे रसभरीत वर्णन समाजमाध्यमांवर करु लागला. कुणी फोटो टाकले. नवीनच हाती आलेल्या मोबाईलच्या माध्यमांतून लोक अहमहमिकेने ही अफवा पुढे पसरवू लागले. चॅनेलच्या मंडळींनी आपले बोंडुक घेऊन आमंत्रण दिलेल्या सेलेब्रिटी आणि राजकारणी मंडळींच्या घरी धाव घेतली. तिथून बाप्पांना दूध पाजण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम लाईव्ह सुरू झाला. या सार्‍या अहमहमिकेमध्ये केवळ केशा...

    पुढे वाचा »

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

हे चित्र... आणि ते चित्र!


  • आमच्या एका जुन्या मित्राने पुण्याच्या ‘महात्मा फुले मंडई’बाबतच्या काही आठवणी तीन-चार दिवसांपूर्वी शेअर केल्या होत्या. त्यात त्याने ‘मंडई विद्यापीठ’ असा शब्द वापरला, आणि आमच्याही आठवणी जाग्या झाल्या. वढाय वढाय असलेल्या मनाने एकावरुन दुसर्‍या अशा उड्या घेत वर्तमानापर्यंत आणून पोचवल्या. माझे शालेय शिक्षण ज्या शाळेत झाले तिला मंडई विद्यापीठ म्हटले जाई. कारण मंडईतील बहुतेक गाळेवाले, मजूर, हळद-कुंकू आदी विकणारे छोटे दुकानदार, असे मंडईच्या परिसरातील मंडळींची मुले या शाळेत शिकत. कारण सोपे होते. मंडईपासून चालत वट्ट तीन मिनिटांच्या अंतरावर शाळा. सकाळी पोरगं गाळ्यावर बसलेलं असे. मग बाजार करून बाप साडेदहा-पावणेअकराच्या सुमारास परतून गाळा ताब्यात घेई, पोरगं धोकटी उचलून शाळेत. त्यामुळे शाळेत अठरा पगड जाती-पातींची मुले. ‘कांबळेच्या घरी खेकड्याची आमटी असते’ ही माहिती खासगीत पुरवून खुसू खुसू हसत त्याची थट्टा करणारा कुणी घाटे असला, तरी कांबळे म्हणजे अमुक आणि घाटे म्हणजे तमुक असा जातींचा हिशोब फारसा होत नसे. वर्गातलं सर्वात दुबळं पोर म्हणून माझी जबाबदारी सार्‍या वर्गाने घेतली होती. पुढे कॉलेज आ...

    पुढे वाचा »

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

व्हेअर इज वॉली


  • ‘मार्टिन हँडफर्ड’ नावाच्या एका ब्रिटिश रेखाचित्रकाराने ‘व्हेअर इज वॉली’ किंवा ‘चित्रात लपलेला वॉली शोधा’ असा एक खेळ त्याच्या ग्राफिक्सच्या सहाय्याने सुरू केला. त्याच्या पुस्तकाच्या पानावर अनेक पात्रे नि चित्रे असत. त्यात कुठेतरी लाल-पांढर्‍या पट्ट्यांचा टी-शर्ट, गोंड्याची गोल नि लाल टोपी आणि गोल फ्रेमचा चष्मा असलेली ही ‘वॉली’ नावाची व्यक्ती लपलेली असे. तुमची दिशाभूल करण्यासाठी, यातील एक-दोन वैशिष्ट्यांसह दुसरे एखादे पात्र चित्रांतील पात्रांच्या भाऊगर्दीत मिसळून देणे, वगैरे क्लृप्त्या चित्रकाराने वापरलेल्या असत. वरवर पाहता जरी हा लहान मुलांचा खेळ असला तरी, मोठेही तो आनंदाने खेळत असत. हाच खेळ अमेरिकेत ‘व्हेअर इज वाल्डो’ या नावाने प्रसिद्ध झाला. (‘द बिग बँग थिअरी’ या टेलिविजन सीरिजच्या चाहत्यांना एका एपिसोडमध्ये सस्पेन्ड झालेला शेल्डन वाल्डो शोधत बसलेला पाहिल्याचे आठवत असेल कदाचित.) ‘वॉली’ऐवजी अमेरिकन स्थानिक वाटावे (आणि काहीही ‘ब्रिटिश’ म्हटले की त्याला नाक मुरडणार्‍या* अमेरिकनांचे नाक सरळ राहावे) म्हणून त्याचा वाल्डो झाला. पुढे अमेरिकन मंडळींच्या डिजिटल आसक्तीचा परिणाम म्हणून तो...

    पुढे वाचा »

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

कन्हैया कुमार, कम्युनिस्ट आणि मी


  • मी कम्युनिस्ट विचारसरणीचा सहानुभूतीदार नक्की आहे. त्यांच्यातील – सर्वच इझम आणि राजकीय पक्षांत असतात, त्यानुसारच असलेल्या – त्रुटींसह मी त्यांना सत्ताधारी म्हणून स्वीकारायला तयार आहे; नव्हे तसं घडावं अशी माझी इच्छा आहे. कारणांबद्दल आता विस्ताराने बोलत नाही. पण हे घडण्याची शक्यता निदान माझा आयुष्यात धूसरच दिसते. याचे मुख्य कारण तत्त्वज्ञानावरची अतिरेकी निष्ठाच त्यांना सत्तेपासून दूर ठेवते आहे. सत्ताकारणातला व्यवहारवाद नाकारल्याने त्यांना सत्ता मिळणे दुरापास्त झाले आहे. ‘ज्योतिबाबूंना मिळू शकणारे पंतप्रधानपद नाकारून त्यांनी घोडचूक केली’ असे माझे प्रामाणिक मत आहे. एकदा सत्ता हाती आली की सर्वत्र ‘आपले’ लोक रुजवून यंत्रणा/व्यवस्था कब्जात घेता येते , हे ते विसरले आहेत. सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या रशियन आणि चीनी बांधवांनी, त्या सामान्यांतील अनेकांचा बळी घेणारी रक्तरंजित क्रांती घडवून आणली, सत्ता हाती घेण्यासाठी विसंगतीचे ते तात्कालिक पाप शिरी घेतले. पण इथले आमचे बांधव ती लवचिकता, संसदीय राजकारणातही स्वीकारायला तयार नाहीत. ‘आम्ही किती छान विश्लेषण करू शक...

    पुढे वाचा »

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

खुला कोष आणि माहितीची ऐशीतैशी


  • विकिपीडीया हा खुला माहितीकोश आणि भारत देशाची संकल्पना यात विलक्षण साम्य आहे. दोन्हींची निर्मिती ज्यांच्या भल्यासाठी झाली होती, त्यांनीच त्यांची पुरी वाट लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मी बहुमताच्या राजकीय लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता असलो, तरी ज्ञानाच्या क्षेत्रात विकिपीडिया जितका खुलेपणा दाखवतो, तो सर्वस्वी मारक ठरतो असे माझे मत आहे. लोकांच्या संदर्भातील नीतिनियम, शासनव्यवस्था, संपत्तीवाटप आदी सामायिक हिताच्या गोष्टींपुरतीच लोकशाहीचा पल्ला मर्यादित ठेवावा लागतो. पृथ्वी गोल आहे की सपाट याचा निर्णय कुठल्याशा वृत्तपत्रात किंवा न्यूज-पोर्टल वर सर्व्हे घेऊन करता येत नसतो. त्याला भूगोल-खगोलाचे ज्ञानच आवश्यक आहे. तिथे “मूठभरांचे मत आम्ही का मानावे. बहुसंख्य लोकांना पृथ्वी त्रिकोणी आहे असे वाटते.” म्हणून ती आपला आकार बदलून त्रिकोणी होत नसते. तरीही माहिती-संकलन म्हणून विकीपीडियाचे स्थान नाकारता येणार नाही. असे असले तरी भारताशी संबंधित सर्व पाने मी सर्वस्वी अविश्वासार्ह मानतो मी ! याचे कारण आपल्या वृत्तीत आहे. पहिले म्हणजे सर्...

    पुढे वाचा »

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

बँकांचा सावकारी पाश


  • (News: In 2017-18 depositors lost 5,000 crores in minimum balance penalties .) या बातमीच्या अनुषंगाने मागे एकदा झालेली चर्चा आणि त्या दरम्यान एका मित्राने उपस्थित केलेल्या मार्मिक प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले. प्रश्न असा आहे की बँक आणि माझ्यासारखे त्यांचे ग्राहक यांचा परस्पर-संबंध समान व्यापाराचे तत्व पाळतो का? आता हेच पहा. मी बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवलेल्या पैशावर मला ६ ते ९ टक्के या रेंजमध्ये मला व्याज दिले जाते. उलट मी बँकेकडून कर्ज घेतो, तेव्हा त्याची रेंज ८ ते १४ टक्के इतकी असते. (पर्सनल लोन्स तर १६ ते २४ टक्क्यांपर्यंत जातात. पण ते अन्सिक्युअर लोन सध्याच्या मुद्द्याला सुसंगत नाही, तेव्हा ते सोडून देऊ.) मी जेव्हा बँकेत पैसे ठेवतो, तेव्हा व्याजाव्यतिरिक्त इतर कोणताही लाभ मला मिळत नसतो. सिक्युरिटीचा विचार कराल, तर जेमतेम १ लाखांपर्यंत (ते ही इन्शुरन्स कंपनीकडून, बँक काखा वर करणार.) ठेव इन्शुअर्ड. पुढचे भगवान भरोसे. उलट मी कर्ज घेतो, तेव्हा कैक पट अधिक व्याज, तारण, इत्यादींचा भडिमार असतो. Andy Rash यांनी The Wall Street Journal साठी काढलेले रेखाचित...

    पुढे वाचा »