-
This is another experience I had couple of years ago. Although in this case I wasn't losing money, but losing my temper. For my oldies I am still subscribed to a satellite Dish TV service. Couple of years back I started getting calls from the company 'informing' me of the fantastic services being offered by the company. When I pick up the call, they used to play recorded message about some service. I used to hang up immediately. Initially it did not bother me much. But I wondered why am I getting calls when I have activated DND service for all except Banking and Finance. But them I realized DND is as useless as United Nations (erstwhile UNO) is, when it comes to resolving inter-country issues. (Israeli Defense minister Moshe Dayan has once said, 'UNO is an umbrella, which is taken away when the rain starts.') Apparently it doesn't apply to those companies where it is registered for a service. But daily four ...
पुढे वाचा »
बुधवार, ३० मार्च, २०२२
Customer is our slave
सोमवार, २८ मार्च, २०२२
The TELCOS back in action
-
The TELCOS back in action... to sneak in and grab your money! Couple of days back I got a message saying I have subscribed to some stupid ’Contakt Gaming service’, which I had not. I have never played paid online games in my life, nor intend to do so in future. I decided I am going to discontinue the service right away. I opened the service App provided by the telecom company. To my surprise, the service wasn't listed under my account. So there was no way I could unsubscribe it from the app. So I decided I am going to call the customer care. There are two numbers provided by the company. I called both. They keep offering six to seven option to chose from... none of them covering deactivation of a value added service. With couple of to and fro jumps (and after about 10-15 minutes), one of them offered to talk to a customer care executive, phew: The executive told me that I may have 'accidentally' clicked some advt link which...
पुढे वाचा »
सोमवार, २१ मार्च, २०२२
अंडे आधी... पण ऑम्लेट की भुर्जी ?
-
’जगण्यातल्या कोणत्याही समस्येला एक योग्य बाजू नि एक किंवा अधिक अयोग्य बाजू असतात; आणि प्रश्न फक्त योग्य बाजू कुठली हे ओळखण्याचा उरतो’ असा बहुतेकांचा समज असतो. त्यामुळे एखाद्या निर्णयाला ते सहजपणे योग्य वा अयोग्य ठरवू शकतात. एका निर्णयाने अपेक्षित परिणाम घडला नाही की तो निर्णय चुकला हे सिद्ध झाले, तरी त्याऐवजी दुसरा पर्याय निवडला असता तर अपेक्षित परिणाम घडलाच असता असे ठामपणे सांगता येत नसते याचे भान बहुतेकांना नसते. पण दोनही (किंवा त्याहून अधिक) पर्यायांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन त्यातील अधिक कार्यक्षम कोणता ते ठरवणे व्यवहार्यही नसते. istockphoto.com येथून साभार ’अंडे आधी की कोंबडी?’ या प्रश्नाचे उत्क्रांती-अभ्यासकांनी उत्तर देऊन ठेवले आहे. पण जेव्हा मुद्दा खाण्याचा येतो, तेव्हा माणसासमोर हा प्रश्न येतो तो मुख्यत: आर्थिक पातळीवर. कुणाला कोंबडी परवडतच नाही म्हणून अंड्यावर भागवावे लागते. त्याहून खालावलेली आर्थिक स्थिती असेल तर अंडे ही देखील कधीतरीच उपलब्ध असणारी चैन असेल. आणि जेव्हा ते उपलब्ध असेल तेव्हाही जेमतेम एखादेच विकत घेणे प...
पुढे वाचा »
बुधवार, १६ मार्च, २०२२
...तर तुमचं लेखन, असतं आम्ही वाचलं
-
काही दिवसांपूर्वी आम्ही दोघे तिघे मित्र बोलत असताना त्यातील एकाने माझ्या एका लेखाचा विषय काढला. त्यावर दुसर्याने "कुठला लेख? मी कसा वाचला नाही?" अशी पृच्छा केली. त्यावर मी म्हणालो, "अरे xxxxxx xx xxx रे. मी तुला व्हॉट्स अॅपवर पाठवला होता की." त्यावर त्याचे उत्तर अतिशय प्रेमळ होते. "इतके लांबलचक नि इतके जड कोण वाचणार? त्यातून तू लिंक पाठवलीस, पुरा लेख पाठवला असतास तर कदाचित(!) वाचला असता. आम्ही आपले समोर येईल तेवढे वाचतो." त्याच्या या प्रेमाने मला गहिवरून आले नि त्याच्यासाठी हे खरडून काढले. फारसे लांबलचक नाही, जड नाही आणि मजकूर पूर्णपणे फेसबुकवर असल्याने ’क्लिक’ करण्याचे कष्टही नाहीत. त्यामुळे निदान हे तरी तो वाचेल अशी आशा आहे. पांढर्या पांढर्या कागदावर असतं जर छापलं, तर तुमचं लेखन, असतं आम्ही वाचलं व्हॉट्सअॅपच्या खिडकीमध्ये असतं पुरं दिसलं तर तुमचं लेखन, असतं आम्ही वाचलं फेसबुकच्या भिंतीवर असतंत जर का ट्यागलं तर तुमचं लेखन, असतं आम्ही वाचलं यू-ट्यूबच्या खिडकीतून डोळे म...
पुढे वाचा »
सोमवार, १४ मार्च, २०२२
आनंदे न्हाती त्यात तृणांची पाती
-
चांगल्या/श्रेष्ठ कवितेचा एक गुण असा की निव्वळ शब्दांपलीकडे जाऊन न लिहिलेल्या, कदाचित अजून न घडलेल्या घटनेवरही ती समर्पक भाष्य करते. कालाच्या, भूगोलाच्या, सामाजिक पार्श्वभूमीच्या सीमा ओलांडून ती व्यापक होते... त्याच वेळी विशिष्ट व्यक्ती, घटना, गट, स्थितीशी सुसंगतही होते तेव्हा ती श्रेष्ठ कविता ठरते. कुसुमाग्रजांची अहि-नकुल या शीर्षकाची कविता आहे. अहि म्हणजे सर्प आणि नकुल म्हणजे मुंगूस या दोन हाडवैर्यांच्या संग्रामाचे चित्रमय शैलीत केलेले वर्णन आहे. शालेय अभ्यासक्रमातही ही कविता शिकविली जात असे, कदाचित अजूनही असेल. त्याच्या अखेरीस सर्पाचे निर्दालन करुन नकुल चालता होतो तेव्हा आम्हा शालेय विद्यार्थ्यांना आनंद होत असे. सर्प म्हणजे वाईट, दुष्ट प्रवृत्तींचे प्रतीक. त्यातच ‘शत्रू मानलेल्या देशातील, धर्मातील अर्भकालाही ठार मारावे, अन्यथा ते मोठे होऊन दहशतवादी होईल नि आपल्याला मारेल’ अशा ‘उदात्त’ विचाराचे ‘संस्कार’ करणारे आसपास अनेक. त्यामुळे त्या नकुलाच्या विजयामध्ये आम्ही आमचा विजय पाहात असू. अर्थात माणूस कायम काही शालेय वयाचा वा समजुतीचा राहात नाही. वय वाढते तसे माणसाची क्षितिजे विस्तारत...
पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जिज्ञासानंद,
तत्त्वविचार,
तत्रैव,
राजकारण,
समाज,
हिंसा
बुधवार, २ मार्च, २०२२
... माणसाची गरज असते
-
ब्रिगेडियर तुमचा रणगाडा, एक ताकदवान वाहन आहे. लाखोंचा जीवनस्रोत असणारे जंगल आणि सहस्र माणसांना तो सहज चिरडून टाकतो. पण त्यांत एक दोष राहून गेला आहे... तो चालवण्यासाठी एका माणसाची गरज असते ! कमांडर तुमचे विमान, आकाशातून आग ओकू शकणारे, एक शक्तिशाली साधन आहे. ते एखाद्या तुफानालाही सहज मागे टाकते, नि एखाद्या हत्तीहूनही अधिक वजन सहज वाहून नेऊ शकते. पण त्यात एक दोष राहून गेला आहे... त्याला जमिनीवरून भरारी घेण्यासाठी एका माणसाची गरज असते. अॅडमिरल तुमची युद्धनौका, पाण्यावरचे मूर्तिमंत सामर्थ्य आहे. कित्येक टन विध्वंसक शस्त्रांसहितही ती पाण्यावर सहज संचार करते. पण त्यात एक दोष राहून गेला आहे... तिचे सुकाणू हाती धरण्यासाठी एका माणसाची गरज असते. जनरल तुमचा माणूस, हे ही एक उपयुक्त हत्यार आहे तो विमान उडवू शकतो, नौका वल्हवू शकतो तसेच जंगल आणि माणसे चिरडूही शकतो. पण त्यातही एक दोष राहून गेला आहे... तो विचार करू शकतो! राष्ट्राध्यक्ष महोदय तुमची सत्ता, विचारांची नसबंदी करणारे एक बलशाली साधन ...
पुढे वाचा »
सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२
अखंड-हिंदुस्तानचे स्वप्न आणि वास्तवातील प्रश्न
-
’अखंड-हिंदुस्तान’ नावाचा घोष हा अगदी लहानपणापासून ऐकत आलेला विनोद वा बागुलबुवा आहे. मुळात ’देशाची फाळणी कुणाच्या तरी लहरीखातर वा मूर्खपणामुळे झाली, एरवी तो आमचा भागच आहे’ हा दावाच खरंतर मूर्खपणाचा असतो. देश म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे. देश म्हणजे त्यातील माणसे, समाज, वारसा, इतिहास यांचा समुच्चय . ’पाकिस्तानही आमचाच आहे आणि तो परत आमच्या देशात सामील व्हावा’ म्हणताना त्यावर राहणार्या, आपल्याला नकोशा वाटणार्या माणसांचे काय करायचे? असा प्रश्न ’अखंड-हिंदुस्तान’वाल्या मुखंडांनी स्वत:ला विचारायला हवा. हा अवघड प्रश्न ते स्वत:ला विचारत नसतात, कारण उत्तर आपल्या सोयीचे येणार नाही, हे निदान त्यांतील विचारशील व्यक्तींना पक्के ठाऊक असते. कुण्या एकाचा वा कुण्या सत्तेच्या लहरीखातर फाळणी होत नसते. जमिनीवरची परिस्थिती, सामाजिक बदलांतून ती घडत असते. देश एकसंघ असेल, तर नकाशावर कृत्रिमरित्या अशी रेघ ओढल्याने दोनही तुकड्यांवरच्या लोकांची बांधिलकी फारशी बदलत नसते. फाळणीमुळे दुभंगलेल्या कुटुंबांच्या दुराव्यातील वेदनेच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत. पण...
पुढे वाचा »
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
हिजाब, मेंदी आणि व्यवस्थांची वेटोळी
-
सुमारे पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कॉन्व्हेंट संचालित शाळेत मुलींनी मेंदी लावली म्हणून त्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आले होते. (त्याहीपूर्वी अशा घटना घडत होत्याच. स्मरणात असलेली ही शेवटची. ) शाळेच्या नियमांत कोणतीही सौंदर्यप्रसाधने (लिपस्टिक, नेलपॉलिश वगैरेंसह) लावण्यास मनाई असल्याने हा शिस्तभंग आहे असे शाळेचे म्हणणे होते. शाळा कॉन्व्हेन्ट संचालित असल्याने लगेचच त्याला धार्मिक वळण मिळाले. मेंदी लावणे ही आमची हिंदू रीत आहे असे म्हणत काही संघटनांनी वादात उडी घेतली. थोडा वाद होताच शाळॆने मुलींवरची निलंबनाची कारवाई रद्द केली... गंमत अशी की तेव्हा आमच्या धार्मिक रीतींना शाळेच्या नियमाहून वरचढ मानावे म्हणणारे आज नेमकी उलट भूमिका घेत आहेत. कारण आता मुद्दा आमच्या नव्हे ’त्यांच्या’ हक्काचा आहे. आणि म्हणून आता या मंडळींना संविधान, शाळेची शिस्त वगैरे आठवते आहे. असे दुसरे एक उदाहरण हा माझा वैय्यक्तिक अनुभवच आहे. काही काळासाठी अमेरिकेतील कंपनीत कामासाठी गेलो होतो. कंपनी प्रामुख्याने भारतीयांचीच. विशेष म्हणजे तिथला कंपनीतील संग...
पुढे वाचा »
Labels:
‘अक्षरनामा’,
धर्मव्यवस्था,
राजकारण,
व्यवस्था,
सत्ताकारण
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)







