-
इतिहासातील व्यक्तिरेखांना खांद्यावर घेऊन ‘बाय असोसिएशन’ आपणही ग्रेट आहोत हे मिरवण्याची संधी लोक साधू इच्छितात. ती व्यक्तिरेखा आपल्या जातीची आणि/किंवा धर्माची असेल तर, तिच्यावर आपला बाय डिफॉल्ट हक्क आहे, आणि अन्य जात/धर्मीयांचा नाही, असे बजावून तिच्यावर ‘रिजर्वेशन’ टाकता येते. त्यातून सामान्यातल्या सामान्याला असामान्यतेच्या भोवती मिरवता येते. जोवर ‘सामान्य असण्यात काही गैर नाही’ हे मान्य करत नाही, उगाचच श्रेष्ठत्वाची उसनी झूल मिरवण्याचे विकृत हपापलेपण माणसाच्या मनातून जात नाही, तोवर हे असेच चालणार. पार्ट्या पाडून, टोळ्या बनवून खेळायला, खेळवायला, हिणवायला आणि माज करायला माणसाला आवडते. इतिहास उकरून काढून आपली दुकाने चालवणारे जसे धर्मवेडे आहेत, तसे जात-माथेफिरूही भरपूर आहेत. गेल्या पंधरा वीस वर्षांत घरबसल्या तथाकथित ‘खरा इतिहास’ लिहिणार्यांची, आणि इतिहासकार म्हणून व्याख्याने झोडित हिंडणार्यांची, एक फौजच तयार झाली आहे. राजकारणात तर इतिहासावरील वाद-विवाद हे अर्थकारणापेक्षा, अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य या मूलभूत गरजांपेक्षाही महत्वाचे झाले आहेत. जसे देव नि धर्म हे श्रद्धेचे, विश्वासाचे, आ...
पुढे वाचा »
सोमवार, ७ मे, २०१८
इतिहासाची झूल पांघरलेले बैल
सोमवार, ३० एप्रिल, २०१८
This, is us!
-
विषयसंगतीमुळे हा लेख ‘ वेचित चाललो... ’ वर हलवला आहे. थोडे संस्करण केलेला हा लेख 'जीवनाचे पोर्ट्रेट या शीर्षकाखाली इथे वाचता येईल. - oOo -
पुढे वाचा »
मंगळवार, २४ एप्रिल, २०१८
समाजमाध्यमातले गुंड
-
सामाजिक बहिष्कार किंवा प्राकृतात ‘वाळीत टाकणे’ ही एक सामाजिक विकृती मानली जाते. केवळ या ब्रह्मास्त्रामुळे अनेक निरपराधांना जातपंचायतीच्या अन्यायकारक निर्णयांपुढे मान तुकवावी लागत असे/लागते. यातून जातपंचायत ही एक शोषक व्यवस्था म्हणून उदयाला आली. त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचे प्रारूप असलेली जातपंचायत, आज विसर्जित करण्यासाठी चळवळ करण्याची वेळ आली आहे. या जुनाट परंपरेचा आविष्कार नव्या स्वरूपात होतो आहे. जे फेसबुकवरून अमुक कंपनीची उत्पादने घेऊ नका. तमुक अभिनेता वा अभिनेत्रीचे चित्रपट पाहू नका. अमके अॅप ताबडतोब अन-इन्स्टॉल करा... असे वाळीत टाकण्याचे आदेश आपल्या ‘जाती’च्या माणसांना देत असतात. उपभोगाची, प्रचार-प्रसाराची आणि उपभोगाची साधने बदलली तरी मानसिकता तशीच मध्ययुगीन, संख्याबळावर एखाद्याचे शोषण करण्याची आहे. आपल्याला हवे तसे त्याने वागावे, आपल्यासमोर मान तुकवावी, यासाठी बुद्धिहीन झुंडीचा वापर हत्यार म्हणून करण्याची पद्धत, विरोधकांऐवजी त्यांच्या स्त्रियांची नालस्ती करण्याची डरपोक वृत्ती ही मनुष्य टोळ्या करुन राहात होता त्यावेळ...
पुढे वाचा »
गुरुवार, १९ एप्रिल, २०१८
पांचामुखी...
-
( कोणतीही चौकशी, कोणताही तपास न होता, केवळ चार न्यायाधीशांच्या ‘मता’नुसार जस्टिस लोयांचा मृत्यू संशयास्पद नाही, एवढे त्या मृत्यूची चौकशी करण्यासही नकार देण्यास पुरेसे आहे, असा अनाकलनीय निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला .) आपल्याकडे ‘पांचामुखी परमेश्वर’ अशी म्हण आहे. चार शहाण्या माणसांचं जसं म्हणणं पडेल, ते योग्य समजून पुढे जावे असा ढोबळ अर्थ घेऊ या. त्यातूनच मग पंचायत ही संकल्पना आली. समाजातील पाच प्रतिष्ठित नि सुज्ञ माणसे पंच म्हणून एकत्र बसत, नि समाजातील समाजातील समस्यांचा निवाडा करत. पुढे जातींचे समाज बनले आणि जातपंचायत उदयाला आली. अर्थात कुणाला सुज्ञ म्हणायचे, शहाणा म्हणायचे हा प्रश्न होताच. पण तरीही काही काळ कदाचित ही व्यवस्था परिणामकारक ठरली असेल. बरं या पंचांना निवाडा करण्यासाठी कोणत्याही वस्तुनिष्ठ पुराव्याची गरज, वा मदत फारशी नसे. बहुतेक सारे काही माणसांच्या शपथेवरील साक्षी नि रुजवात घालण्यावर ठरे. आणि यात पंचाचे पूर्वग्रह मिसळले, कि निवाडा तयार होई. तो ‘न्याय’ असेलच असे नाही. पण यातून मग पंचांचा पक्षपात, गुन्हेगा...
पुढे वाचा »
शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८
शेणकिड्यांचा समाज माझा
-
अनेक दिवसांनी फेसबुकवर काल थोडा वेळ घालवला नि पश्चात्ताप झाला. आपण किती क्षुद्र, नृशंस, किळसवाणे लोक आहोत याचे पुरेपूर दर्शन घडले. आपले संस्कार किडके आहेत, माणसे किडकी आहेत. आपण माणसाकडे माणूस म्हणून पाहायला शिकवत नाही. त्याच्याकडे हिंदू किंवा मुस्लिम, ब्राह्मण किंवा दलित, आमच्या ग्रेट ओसाडवाडी पेक्षा दुय्यम असलेल्या उकिरडावाडीचा माणूस, स्त्री नव्हे मादी– मग ती आठ वर्षांची असो वा सत्तर वर्षांची, असे पाहायला शिकवतो. आपल्या बिनअकली सुमारपणाचे खापर आपण अन्य गटांवर फोडून कांगावा करतो. आठ वर्षांच्या पोरीवर झालेल्या बलात्काराची बातमी ऐकूनही, आमची पहिली चिंता असते ती आमचा नेता, आमचा धर्म, आमचा दगडी देवबाप्पा वाचवण्याची. असल्या किळसवाण्या मानसिकतेला धारण करणार्या कुडीला माणूस तर सोडा, जनावर म्हणणे हा जनावराचा घोर अपमान आहे. आमची संस्कृती महान आहे म्हणणारे, आपल्या नृशंस लोकांना पाठीशी घालताना आम्ही पाहतो, वर ‘त्यांनी केले तेव्हा कुठे होतात’ हे आत्यंतिक मूर्खपणाचे- नव्हे क्रूरतेचे समर्थन देताना पाहतो. त्यांनी जे केले ते ते सारे तुम्ही केले तर क्षम्य मानावे असे असेल, तर भिकारड्यांनो तुमची...
पुढे वाचा »
मंगळवार, १० एप्रिल, २०१८
सीसल आणि ससुल्या
-
तुम्ही कार्टुन्स पाहता की नाही ठाऊक नाही. ‘वॉर्नर ब्रदर्स’च्या प्रसिद्ध बग्स बनी या पात्राचा सर्वात पहिल्या एपिसोडमध्ये ससा-कासवाच्या त्या प्रसिद्ध शर्यतीची कथा सांगितली होती. ‘बग्स बनी’ला मूळ कथा आधीच माहीत असल्याने, कुठेही विश्रांती घ्यायची नाही असे ठाम ठरवून, ते साध्यही करतो. पण तरीही बिचारा ती शर्यत हरतोच ... ...त्याचे कारण असतो तो सीसल नावाचा चलाख टर्टल, ज्याच्याशी बग्सने शर्यत लावलेली असते. या सशाला दोन कासवांमध्ये काही फरक चटकन दिसत नसल्याचा फायदा घेत, शर्यतीच्या वाटेवर एकुण दहा कासवे उभी केलेली असतात. ‘कितीही वेगाने धावलो, कासवाला मागे टाकले तरी, पुढे जावे तो कासव पुन्हा आपल्या पुढेच’ पाहून बग्सला हे कसे घडते ते कळत नाही. शक्य तितका वेग वाढवत तो अंतिम रेषा पार करतो. बघतो तर सीसल तिथे आधीच हजर असतो. निमूटपणे पैजेचे दहा डॉलर बग्स त्याला देतो. मूळ कथेमध्ये ‘स्लो अॅंड स्टेडी विन्स द रेस’ हा संदेश दिला होता. पण या कार्टुन एपिसोडमध्ये सीसल टर्टल हे चक्क संख्याबळाचा आधार घेऊन चीटिंग करुन रेस जिंकते , असे दाखवले आहे. मूळची स...
पुढे वाचा »
Labels:
आस्वाद,
चलच्चित्रे,
जिज्ञासानंद,
संस्कृती,
समाज
शुक्रवार, ३० मार्च, २०१८
‘माझा’ धर्म आणि मी
-
धर्म ही स्वीकारण्याची, अनुसरण्याची गोष्ट आहे, लादण्याची नव्हे. माझा धर्म कोणता हे मीच ठरवणार, अन्य कुणी ठरवून कसे चालेल? जर मी ‘पास्ताफारियन’ आहे आणि मी ‘फ्लाईंग स्पागेती मॉन्स्टर’ या देवाची पूजा करणार आहे, तर इतर कुणी त्यावर कसे काय आक्षेप घेऊ शकतील? जन्मजात मिळालेला धर्म हाच तुमचा धर्म असला पाहिजे, असे बंधन जगाच्या पाठीवर कुठेही नाही . पण बहुतेक माणसे आळशी असतात. वारशाने, अनायासे जे मिळाले तेच श्रेष्ठ मानून चालतात. इथवर ठीक असते. पण इथेच न थांबता, पुढे इतरांनीही ते मानावे म्हणून आग्रह धरतात, इतरांचा धर्म मोडून काढायचा प्रयत्न करतात. हा मूर्खपणा तर आहेच, पण इतरांच्या अधिकारांचे उल्लंघनही आहे. आम्ही बहुसंख्य आहोत म्हणजे आम्ही म्हणू तसे नियम, हे बहुमताच्या राजकीय व्यवस्थेबाबत खरे आहे. पण तोच नियम धार्मिक बाबतीत लावता येणार नाही. राजकीय व्यवस्था ही केवळ तेवढ्याच धार्मिक गोष्टींत हस्तक्षेप करु शकेल, जिच्या द्वारे तिच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी, सामाजिक परस्परसंबंध, हक्क नि आचारसंहिता, संपत्तीचा विनियोग इत्यादि बाबतीत संघर्ष होऊ शकत...
पुढे वाचा »
Labels:
जिज्ञासानंद,
धर्मव्यवस्था,
भाष्य,
भूमिका,
समाज
बुधवार, २८ मार्च, २०१८
मास्तरकीचे दिवस
-
मी गणिताचा मास्तर होतो. राजकारण्याला जशा निवडणुका चुकत नाहीत, तशा मास्तरला परीक्षांचे पेपर सेट करणे नि तपासणे हे भोग टळत नाहीत. अशाच एका पेपरमध्ये एका टॉपरच्या पेपरमध्ये एका प्रश्नाच्या उत्तराला – जे पूर्ण चूक होते – मी शून्य मार्क दिले. ती माझ्याकडे विचारणा करायला आली. मी ते गणित कसे सोडवायचे ते दाखवून, रीत आणि उत्तर दोन्ही समजावून दिले, आणि तुमचे दोनही चुकले हे पटवून दिले. ते मान्य करुनही तिचा तर्क होता, ‘पण इतके लिहूनही शून्य मार्क कसे काय देऊ शकता तुम्ही?’ मी म्हटलं, ‘अहो तुम्हाला गीतेतले श्लोक लिहायला सांगितले, तुम्ही मनाचे श्लोक लिहून ठेवले... कसे मार्क देणार?’ आपल्या परीक्षा व्यवस्थेत विद्यार्थ्यांनी मास्तरांना चांगलेच जोखून ठेवले आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहीत नसले, तरी पानभर काहीतरी लिहून ठेवायचे असा त्यांचा बाणा असतो. (काही मंडळी तर सरळ प्रश्नच पुन्हा उतरवून काढत) फूटपट्टी घेऊन बसलेले मास्तर लांबीनुसार मार्क देतात. ‘मार्क देणार्या’ अशी ख्याती असलेल्या एका मॅडमच्या क्लासमध्ये असावे, म्हणून लोक चक्क एक सेमिस्टर ड्रॉ...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)







